माउली विवाह संस्था तुमच्यापर्यंत अगदी तुमच्या घराशेजारील ते प्रत्येक नात्यागोत्यातील (गावाकडील तसेच शहरातील) तुम्हाला अनुरूपस्थळांची माहिती संस्थेच्या माध्यमातून अगदी घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध करून देत आहे
असे म्हणतात की “कोकणची माणसे साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी,” या उक्ती प्रमाणेच अश्या प्रेमळ व संस्कारी मनांना ‘विवाह’ या अतिशय नाजूक व भावनिक विषयाची तार छेडून एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
आजचा कोकणी माणूस तसा बऱ्यापैकी शेती व शिक्षणाने प्रगत होऊन कोकणातच स्थिरस्थावर होतोय, तरीसुद्धा उच्चशिक्षण व नोकरी- धंद्यानिमित्त मुंबई- पुण्यासारख्या शहरात पर्यायाने जावेच लागत आहे.परंतु तेथे जाऊन शांत बसेल तो कोकणी माणूस कसला जिथे जाईल तेथे प्रामाणिकपणे कष्ट करून स्वतःच्या क्षेत्रात स्वताची वेगळी ओळख निर्माण करून नावारूपाला आला आहे.